Aapli Chawadi तर नमस्कार मित्रांनो आपण पहिले तर पूर्वी आपल्या जमिनीचे व्यावहार म्हणजेच खरेदी किंवा विक्री झाल्यावर ती प्रक्रिया पूर्ण होऊन १५ दिवसानंतर तलाठी किंवा भुमिअभिलेख च्या कर्मचारी द्वारे हरकत किंवा आक्षेप नोटीस लावण्यात येत होती. तसेच पूर्वी आपल्याला आपल्या मालमात्तेची खरेदी किंवा विक्री झाली असेल तर ते सर्व पाहण्यासाठी आपल्याला तलाठी किंवा तहशील कार्यालयात जावे लागत होते. त्यानंतर आपल्याला पुढील हरकत करता येत होती परंतु यामध्ये भरपूर वेळ वाया जात होता.
तर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही गावाचा Online Ferfar पहायचा असेल तर पूर्वी तुम्हाला तहशील कार्यालायाद्वारे तुम्हला एक नोटीस पाठवली जात होती. तसेच ती Ferfar Notice तुम्हाला मिळायला खूप वेळ जात होता कारण ती नोटीस हि पोस्टाद्वारे पाठवली जात होती. परंतु आता महाराष्ट्र सरकारच्या Bhumiabhilekh कार्यालयाद्वारे Aapli Chawadi या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे.
महत्वाच्या लिंक
( महाराष्ट्र ) सर्व गावांचे नकाशे | महाभूलेख 7 12 उतारा 8अ, मालमत्ता पत्रक |
जुने 7 12 उतारा, 8अ, फेरफार | डिजिटल सही असलेले 7/12 उतारा, 8अ, फेरफार |
तर apli chavadi या वेबपोर्टल वर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही गावाचा e ferfar तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर apli chawadi किंवा ferfar म्हणजे कोणत्याही जमिनीचा कसल्याही प्रकारचा व्यवहार म्हणजेच खरेदी विक्री झाली असेल तर त्या गट नंबर मधील सर्व लोकांना त्याची माहिती दिली जाते. व यावर जर कोणाची काही हरकत असल्यास तो व्यक्ती तहशील कार्यालयात हरकत नोंदवू शकतात.
Aapli Chawdi apli chavadi Ferfar फेरफार नोंदीचे प्रकार
- खरेदी करणे
- विक्री देणे
- बोजा कमी करणे
- हक्कसोड पत्र
- बक्षीस पत्र
- आदेश व दास्तैवेज
Apli Chawadi वेबपोर्टल वर Online Ferfar Notice कशी पहावी.
- तर मित्रांनो Online Ferfar पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi या वेब अड्रेस ला ओपन करावे लागेल.
- दिलेला वेबअड्रेस ओपन झाल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
- तर तुमच्या समोर वरती दाखवल्या प्रमाणे तुमच्या समोर एक पेज ओपन झालेले असेल. यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम 5 प्रकारचे Online Notice पाहायला मिळणार आहे. ( 7/12 ferfar, Property card Ferfar, Mojani Notice, Svamitva Notice, eQJ Notice )
- तर तुम्हाला यापैकी कोणते कागदपत्र पहायचे आहेत ते तुम्हाला निवडायचे आहे.
- यानंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
- आता तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
- त्यानंतर खाली दिलेला captcha भरायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला आपली चावडी पहा यावर क्लिक करायचे आहे.
- तर वरती फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे तुमच्या समोर एक पेज ओपन झालेले असेल यावर तुम्हाला तुम्ही निवडलेला जिल्हा, तालुका व गाव दिसेल.
- तसेच खाली सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी कार्यालय दिसेल म्हणजेच झालेला व्यावहाराचा निकाल हा कोणत्या कार्यालयात झालेला आहे.
- यानंतर नोंदणीचा क्रमांक
- यानंतर फेरफार नंबर म्हणजेच तुमच्या फेरफारचा नंबर
- यानंतर फेरफारचा प्रकार म्हणजेच कोणत्या स्वरूपात व्यवहार झालेला आहे उदा -: बोजा कमी करणे , हक्कसोड पत्र, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, आदेश व दस्तेवज, अविभाज्य हिस्सा विक्री, भाड्याने देणे इतर फेरफार
- यानंतर संबंधित फेरफारचा दिनांक
- यानंतर हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख
- यानंतर संबंधित गट नंबर व सर्वे नंबर दिसतात फेरफार पाहण्यासाठी गट नंबर व सर्वे नंबर समोर पहा या बटन वर क्लिक करायचे आहे यानंतर तुमच्या समोर संपूर्ण फेरफार apli chavdi द्वारे ओपन होईल,
- पहा या बटन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही निवडलेला संपूर्ण फेरफार ओपन होईल यामध्ये नोंदीचा प्रकार, लिहून देणार व लिहून घेणार खरेदी दस्त क्रमांक व खरेदी किंमत सर्व पारदर्श दाखवले जाते.
- हे सर्व पाहून जर तुम्हाला कोणतीही हरकत नोंदवायची असेल तर तुम्ही तहशील कार्यालयात जाऊन यावर हरकत नोंदणी करू शकता.
तर नमस्कार मित्रानो आम्ही असेच महत्वाचे व माहितीपुर्वक लेख मराठी मध्ये घेऊन येत आहोत आमच्या या कार्याला तुमचा असाच प्रतिसाद राहो. आम्हाला आशा आहे कि आम्ही दिलेली Aapli Chawdi,apli chavdi Ferfar बद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल व यामुळे तुमचा खूप फायदा देखील झाला असेल तर आम्हाला अस्साच प्रतिसाद द्या धन्यवाद.
Aapli Chawadi, apli chavadi Ferfar Video
Aapli Chawadi, apli chavadi Ferfar FAQ
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील 7/12 कसा डाउनलोड करावा?
या साठी महाराष्ट सरकारने https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या पोर्टल चे निर्माण केले आहे यावर तुम्ही सर्व जिल्ह्यातील 7/12 उतारा पाहू शकता.
Digitally Signed 7/12, Digitally Signed 8A, Digitally signed Property Card कसे पाहावे?
यासाठी महाराष्ट्र सरकारने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR या पोर्टल चे निर्माण केले आहे यावर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील कागदपत्र पाहू शकता.
mahabhunaksha मोबाइल मध्ये कसा पाहावा?
mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहण्यासाठी महारष्ट्र सरकारने https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html या पोर्टल चे निर्माण केलेलं आहे यावर जाऊन तुम्ही mahabhunaksha मोबाइल मध्ये पाहू शकता.