Mahabhunakasha Bhunaksha Maharashtra तर नमस्कार मित्रानो याठिकाणी आपण महाराष्ट्र सरकारने अद्याप सुरु केलेल्या Mahabhunakasha या वेब पोर्टल बद्दल जाणून घेणार आहोत. तर पूर्वी आपल्याला आपल्या जमिनीचा गट नंबर चा mahabhunaksha पहायचा असल्यास आपल्याला तलाठी कार्यालय किंवा तहशील कार्यालयात जावे लागत होते. तसेच यामध्ये खूप वेळ वाया जात होता व आपली महत्वाची कामे अडून राहत होती. तसेच यामुळे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यावर खूप ताण येत होता व यासाठी पुरेसे कर्मचारी देखिल नव्हते याच गोष्टी लक्षात घेऊन.
महत्वाच्या लिंक
महाभूलेख 7 12 उतारा 8अ, मालमत्ता पत्रक | आपली चावडी डिजिटल नोटीस बोर्ड |
जुने 7 12 उतारा, 8अ, फेरफार | डिजिटल सही असलेले 7/12 उतारा, 8अ, फेरफार |
महाराष्ट्र सरकारने जमिनीसंबंधीत अनेक कागदपत्रे हि ऑनलाईन स्वरूपात आणलेली आहे त्यामधील bhu naksha maharashtra हे एक नवी संकल्पना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्याही गावाचा नकाशा तुम्हाला पाहायला मिळेल. Bhunaksha गावातील जमिनीचे गट नंबर नुसार त्या गट नंबरची हद्द किती पर्यंत आहे व किती लांब व रुंद आहे हे दर्शविण्यास मदद करते. यावर महाराष्ट्रातील प्रत्येक विभागाचा gav nakasha यावर उपलब्ध आहे,
MahaBhunakasha, Bhunaksha Maharashtra Online कसा पाहावा.
- तर mahabhunakasha bhunakasha maharashtra पाहण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html या वेब पोर्टल ला आपल्या मोबाइल मध्ये ओपन करावे लागेल.
- https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.html हा वेब अड्रेस ओपन केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल खाली फोटो मध्ये दाखवल्या प्रमणे.

- bhunakasha maharashtra Online पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला उजव्या कोपऱ्यातील बाणावर दाबायचे आहे.
हि सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही निव्लेल्या गावाचा gav nakasha तुमच्या समोर ओपन होईल अगदी तुमच्या मोबाइल वर खाली फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे.

- यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा गट नंबर शोधायचा आहे व तुमच्या जमिनीच्या गट नंबर चा नकाशा तुम्हाला Download करायचा असेल तर.
- भू नक्शा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला गट नंबर सर्च करण्यासाठी 1 ला पर्याय दिलेला आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या जमिनीचा गट नंबर टाकून सर्च करून तुम्ही भू नक्शा मिळवू शकता.
- यानंतर तुम्हाला 2 रा पर्याय दिलेला आहे यावर तुम्हाला जेवढे पण गट नंबर आहेत सर्व लिस्ट मध्ये दाखवले जातील यामध्ये तुम्हाला तुमचा गट नंबर शोधायचं आहे व त्यावर क्लिक करायचे आहे,
- तसेच खाली Map Report वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली दाखवल्या प्रमाणे पेज ओपन होईल.

- वरती फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे तुम्हला Download बटन वर क्लिक करून तुमच्या जमिनीचा mahabhunakasha मध्ये Download करून घ्यायचा आहे.
तर नमस्कार मित्रांनो आशा आहे कि आम्ही दिलेली mahabhunakasha बद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल व यामुळे तुमचा खूप फायदा देखील झाला असेल तर आम्ही अशीच महत्वपूर्ण माहिती मराठी मध्ये घेऊन येत आहोत आमच्या या प्रयत्नांना तुमची अशीच साथ राहो धन्यवाद.
mahabhunakasha bhunaksha maharashtra Video
mahabhunakasha bhunaksha maharashtra FAQ
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील 7/12 कसा डाउनलोड करावा?
या साठी महाराष्ट सरकारने https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या पोर्टल चे निर्माण केले आहे यावर तुम्ही सर्व जिल्ह्यातील 7/12 उतारा पाहू शकता.
Digitally Signed 7/12, Digitally Signed 8A, Digitally signed Property Card कसे पाहावे?
June 7 12 ( old 7/12) मोबाइलवर ऑनलाईन कसे पाहू शकतो.
https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/LogIn/LogIn या पोर्टल वर जाऊन तुम्ही जुने 7/12 उतारा पाहू शकता.