आता महाराष्ट्र सरकार च्या नोंदणी व मुद्रांक विभाग द्वारे 1985 सालानंतर चे दस्त हे online स्वरूपात आणले गेले आहेत तर Index 2 (ii) चा वापर करून आपण ते दस्त पाहू शकतो महाराष्ट्रातील जमीन, मालमत्ता, किंवा इतर कायदेशीर दस्तऐवज शोधायचे असतील, तर Index 2 (ii) gr Maharashtra Document Search ही ऑनलाइन सुविधा तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ही सेवा महाराष्ट्र सरकारच्या इंस्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन (IGR) विभागाद्वारे पुरवली जाते आणि त्यात जुन्या ते नवीन अशा सर्व प्रकारच्या नोंदणीकृत दस्तऐवजांची माहिती सहजपणे मिळवता येते. या लेखात, आम्ही तुम्हाला या सेवेची सर्व महत्त्वाची माहिती सोप्या मराठीत समजावून सांगू.
योजनेचे नाव | Index 2 ( ii ) igr Maharashtra |
योजना कोणत्या राज्यासाठी आहे | महाराष्ट्र |
योजनेचे उद्दिष्ट काय आहे | सर्व नागरिकांना 1985 पासून चे दस्त पाहता यावे |
योजना कोणी सुरु केली | महाराष्ट्र भूमी अभिलेख कार्यालय |
अधिकृत वेबसाईट | https://igrmaharashtra.gov.in/ |
Index 2 (ii) igr Maharashtra Document सर्चचे महत्त्व
- 🕵️♂️ वेळेची बचत: ऑनलाइन पद्धतीने दस्तऐवज शोधल्याने ऑफिसला भटकण्याची गरज नाही.
- 📑 पारदर्शकता: दस्तऐवजांची हक्काची माहिती डिजिटल पद्धतीने उपलब्ध.
- 💻 सुलभता: घरबसल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरून 24×7 शोधा.
- 🛡️ सुरक्षितता: अधिकृत वेबसाइटवरून मिळणारी खात्रीशीर माहिती.
index 2 online igr maharashtra online search दस्त कसे पाहावे.
तर नमस्कार मित्रानो igr maharashtra online Document चे index 2 कसे पाहावे तर मितारानो यासाठी सर्व प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइल मध्ये https://igrmaharashtra.gov.in/ हे वेब अड्रेस ओपन करावे लागेल त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.

- आता तुम्हाला इ शोध वर क्लिक करायचे आहे व त्यामधील विनाशुल्क सेवा 1.9 यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज ओपन होईल.

- आता तुमच्यासमोर वरती दाखवल्या प्रमाणे एक पेज ओपन झालेले असे त्यामध्ये सुरवातीला तुम्ही Property Details म्हणजे तुमच्या जमिनीच्या गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकून Document Search करता येते किंवा Document Number जर तुम्हाला माहिती असेल तर दस्त नंबर टाकून तुम्ही यावर शोधू शकता.
- व त्याखाली तीन रकाने आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणत्या विभागाचा igr Maharashtra Index 2 पहायचा आहे ते निवडा.
- मुबई शहर, उर्वरित महाराष्ट्र यात सर्व गावे येतात, व महाराष्ट्रातील शहरी भाग यापैकी तुम्हाला जे हवे आहे ते निवडा.

- igr Maharashtra Document Search करण्यासाठी सर्वप्रथम ज्या वर्षी तुमचा दस्त झालेला अईल ते वर्ष निवडायचे आहे.
- त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर Captcha भरून खाली शोध या बटन वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर त्यावर्षी तुम्ही टाकलेल्या गट नंबर वर जर कोणताही दस्त झाला असेल तर तो तुमच्या समोर येईल.
- आता Index 2 या बटन वर क्लिक करून तुम्ही तो संपूर्ण दस्त पाहू शकता.
तर नमस्कार मित्रानो आम्हाला आशा आहे कि आम्ही दिलेल्या Index 2 ( ii ) igr Maharashtra Document Search बद्दलची माहिती हि आवडली असेल व यामुळे तुमचा खूप फायदा देखील झाला असेल तर आम्ही अशीच माहिती मराठीमध्ये घेवून येत आहीत आमच्या या प्रयत्नांना तुमची अशीच साथ राहो धन्यवाद.
Index 2 ( ii ) igr Maharashtra Document Search
Index 2 (ii) मध्ये कोणत्या वर्षांचे दस्तऐवज उपलब्ध आहेत?
सध्या, 1985 पासूनचे नोंदणीकृत दस्तऐवज शोधता येतात. नवीन अपडेट्स वेबसाइटवर प्रदर्शित केल्या जातात.
Index 2ही सेवा वापरण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे का?
नाही, तुम्ही विनामूल्य रजिस्ट्रेशनशिवाय दस्तऐवज शोधू शकता.
दस्तऐवजात चुका आढळल्यास काय करावे?
संबंधित सब-रजिस्ट्रार ऑफिसला भेट द्या किंवा IGR हेल्पडेस्कवर तक्रार नोंदवा.
ऑनलाइन मिळालेल्या माहितीची प्रमाणिकता कशी तपासावी?
दस्तऐवजाचा मूळ प्रत मिळवण्यासाठी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये अर्ज करावा.