तर नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कि 7/12 Varas Nond Online पद्धतीने कश्याप्रकारे केली जाते तर. यासाठी महाराष्ट्र सरकारने Bhumiabhilekh कार्यालयाद्वारे एक वेगळे पोर्टल सुरु करण्यात आलेली आहे. तर Varas Nond करण्यासाठी आपल्यला e hakk प्रणाली द्वारे Public Data Entry pdeigr.maharashtra.gov.in या वेब पोर्टल चे निर्माण करण्यात आलेले आहे. 7/12 Varas Nond करण्यासाठी आता आपल्याकडे Online Offline असे 2 पर्याय आहेत.
तर मित्रांनो Varas Nond हि तेव्हा केली जाते जेंव्हा एखादी शेतजमीन किंवा इतर कोणतीही मालमत्ता एखाद्या व्यक्तीच्या नावे असेल व त्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला असेल तर. त्याच्या कुटुंबातील इतर वारसांना त्याचा हक्क मिळतो परंतु त्यासाठी वारस नोंद करणे आवश्यक आहे. व यामुळे मयत व्यक्तीच्या नावे असणारी मालमत्ता हि त्याच्या वारसांनाच मिळते.
योजनेचे नाव | 7/12 Varas Nond Online Public Data Entry |
योजना कोणी सुरु केली | Maharashtra Govermnet Bhumiabhilekh Office |
योजनेचा उद्देश | Online Varas Nond |
योजना कोणत्या राज्यासाठी आहे | Maharashtra |
अधिकृत वेबसाईट | https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin |
7/12 Varas Nond साठी अर्ज कोण करू शकतो.
- मयतव्यक्तीची मुले
- मयतव्यक्तीची पत्नी/पती
- मयत व्यक्तीची आई/वडील
7/12 Varas Nond Documents वारस नोंद करण्यासाठी लागणारी कागदपत्रे .
- मयत व्यक्तीचा ग्रामपंचायत कडून मिळालेला मृत्यू चा ओरीजनल दाखला.
- Varas Nond Form तालुक्याच्या ठिकाणी कोणत्याही झेरोक्स दुकानावर मिळेल.
- गावचा पोलीस पाटील यांचा जबाब व सही.
- 2 साक्षीदार व त्यांच्या सह्या.
- वारसांची माहिती व्यवस्थित भरायची आहे.

7/12 Varas nond online registration कशी करावी.
तर मित्रांनो 7/12 Varas Nond Online करायची असेल तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin हि लिंक तुमच्या मोबाइल वर ओपन करायची आहे.त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.

- जर यावर तुमचे आधीच Account नसे तर सर्वात आधी यावर तुमचे Account बनवून घ्यायचे आहे त्यासाठी तुम्हाला Creat new Account वर क्लिक करायचे आहे व त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन Form भरण्यासाठी येईल.

- Form मध्ये दिलेली माहित व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक User id व Password मिळेल.
- मिळालेला User id व Password टाकून तुम्हाला Varas nond online login करायचे आहे.
- त्यानंतर तुम्च्यासोर एक वेगळी स्क्रीन ओपन होईल.

- 7/12 Varas Nond Online करण्यासाठी तुम्हाला 7/12 Mutations यावर क्लिक करायचे आहे. आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेले असेल.

- आता याठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे.
- त्यानंतर तलाठ्याकडे ज्या फेर्फार्साठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडायचा आहे.
- ई करार, बोजा चढवणे/गहाणखत, बोजा कमी करणे, वारसनोंद, मयताचे नाव कमी करणे, अ.पा.क शेरा कमी करणे. ए.कु.मे शेरा कमी करणे, विश्वस्तांचे नाव बदलणे, खातेदारची माहिती भरणे, हस्तलिखित व संगणीकृत सातबारा मध्ये तफावत दुरुस्ती, मयत कुळाची वारस नोंद.
- तर आता याठिकाणी तुम्हाला Varas nond यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.

- तर याठिकाणी तुम्हाला अर्जदाराची माहिती तुम्हाला भरायची आहे म्हणजे अर्ज कोण करणार आहे त्याची माहिती. सर्व माहिती भरून पुढे जा यावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर खातेदारची माहिती भरण्यासाठी येईल.

- याठिकाणी तुम्हला सातबारा उतारा मधील खाता नंबर टाकून खातेदार शोध यावर क्लिक करायचे आहे. खाता क्रमांक वेगळा आणि गट नंबर वेगळा असतो हे लक्षात घ्या.
- आता तुम्हाला त्या खात्याशी निगडीत ज्या व्यक्ती आहेत त्यांची नावे येतील त्यामधील तुमचा व्यक्ती शोधून त्याचे नाव निवडायचे आहे.
- व त्याखाली वर्षांची नावे भरण्यासाठी एक फोर्म असेल त्याठिकाणी वर्षांची नावे भरायची आहे.

- याठिकाणी तुम्हाला दिलेली कागदपत्र अपलोड करायची आहेत.
तर नमस्कार मित्रांनो आम्हाला आशा आहे कि आम्ही दिलेल्या 7/12 Varas Nond Online बद्दलची माहिती हि तुम्हाला आवडली असेल व यामुळे तुमचा खूप[ फायदा देखील झाला असेल तर आम्ही अशीच माहिती मराठीमध्ये घेवून येत आहोत आमच्या या प्रयत्नांना तुमची अशीच साथ राहो धन्यवाद.
Varas nond form in marathi pdf
7/12 Varas Nond Online Video
7/12 Varas Nond Online FAQ
वारस नोंद कशी करावी ?
Varas Nond हि तेव्हा केली जाते जेंव्हा एखादी शेतजमीन किंवा इतर कोणतीही मालमत्ता एखाद्या व्यक्तीच्या नावे असेल व त्या व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाला असेल तर. त्याच्या कुटुंबातील इतर वारसांना त्याचा हक्क मिळतो परंतु त्यासाठी वारस नोंद करणे आवश्यक आहे. व यामुळे मयत व्यक्तीच्या नावे असणारी मालमत्ता हि त्याच्या वारसांनाच मिळते.
वारस नोंद साठी लागणारे कागदपत्र ?
मयत व्यक्तीचा ग्रामपंचायत कडून मिळालेला मृत्यू चा ओरीजनल दाखला.
Varas Nond Form तालुक्याच्या ठिकाणी कोणत्याही झेरोक्स दुकानावर मिळेल.
गावचा पोलीस पाटील यांचा जबाब व सही.
2 साक्षीदार व त्यांच्या सह्या.
वारसांची माहिती व्यवस्थित भरायची आहे.
वारसनोंद साठी अर्ज कोण करू शकते ?
मयतव्यक्तीची मुले
मयतव्यक्तीची पत्नी/पती
मयत व्यक्तीची आई/वडील